
फलटण : जैन सोशल ग्रुप, संगिनी फोरम व युवा फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण नगर परिषद व प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूल, गुणवरे ता. फलटण येथे जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे सरस्वती शिक्षण संस्था, गुणवरेचे सचिव विशाल पवार, सविता दोशी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव निना कोठारी, खजिनदार राजेश शहा, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, तुषार शहा, डॉ. मिलिंद दोशी, प्रितम गांधी, मनिषा घडिया, सदस्य रोहीत गांधी, सौरभ दोशी, संगिनी फोरमच्या अध्यक्षा मनिषा व्होरा, सचिव वृषाली गांधी, खजिनदार विनयश्री दोशी, सदस्या सुरेखा उपाध्ये, युवा फोरमचे अध्यक्ष पुनीत दोशी, सचिव सिध्देश शहा, खजिनदार मिहीर गांधी, सहसचिव क्षितीज घडिया, संचालक अक्षय दोशी, यशराज दोशी, सदस्य पुर्वल शहा आदींची उपस्थिती होती.
योगा प्रशिक्षक वृषाली गांधी यांनी यावेळी योगाचे धडे दिले. कु. श्रध्दा शिंदे, प्रियंका शिंदे, परिणीती कदम, आर्या वादे या विद्यार्थिनींनी योगाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे योगाची प्रत्यक्षिके सादर केली. ब्रिलियंट अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनीही योगा डे च्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन यांनी प्रास्ताविकात योगाचे महत्व विषद करुन जागतिक योगा डे च्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलमधील योगा मधे विशेष प्राविण्य मिळवलेल्या तीन विद्यार्थ्यांना योगा मॅट भेट देऊन त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीप्ती राजवैद्य यांनी तर आभार प्रदर्शन निना कोठारी यांनी केले.

