
फलटण : सन २०२३ते २०२५ या कार्यकाळात जैन सोशल ग्रुप अंतर्गत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जैन सोशल ग्रुप, फलटण यांना ‘रत्नस्तंभ’ व संगिनी फोरम, फलटण यांना ‘सुवर्णस्तंभ’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर फलटण येथील जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सविता दोशी यांना व संगिनी फोरमच्या अध्यक्षा अपर्णा जैन यांना ‘बेस्ट प्रेसिडेंट’ तर युवा फोरमचे सचिव पुनीत दोशी यांना ‘बेस्ट सचिव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिझनच्या कॉन्फरन्स व अवॉर्ड सेरेमनी कार्यक्रमात सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष बिरेन शहा, महाराष्ट्र रिजन अध्यक्ष उन्मेश करनावट, अवार्ड कमिटी कन्व्हेनर प्रिती करनावट, प्रितेश तातेड, इंटरनॅशनल डायरेक्टर महावीर पारेख, सोलापुर झोन कॉर्डिनेटर सुनिल लोढा, कोल्हापूर झोन कॉर्डिनेटर सौ. रज्जूबेन कटारिया आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास जैन सोशल ग्रुप, संगिनी फोरम व युवा फोरमचे राज्यभरातील पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर यशाबद्दल पुरस्कारार्थींचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी, श्रीराम बझारचे संचालक तुषार गांधी, जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव प्रितम शहा, खजिनदार समीर शहा, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, संगिनी फोरमच्या संस्थापक अध्यक्षा स्मिता शहा, माजी अध्यक्षा नीना कोठारी, संगिनी फोरम सचिव प्रज्ञा दोशी, खजिनदार मनीषा घडिया, युवा फोरमचे अध्यक्ष तेजस शहा, खजिनदार मिहीर गांधी आदींनी अभिनंदन केले.

