
फलटण : सुवर्ण परिस स्पर्श फाउंडेशन, जाधववाडी ता. फलटण यांच्यावतीने हळदीकुंकू समारंभ पारंपारिक वेशभूषेत आलेल्या महिलांच्या विविध स्पर्धांसह उत्साहात पार पडला.
यावेळी सुवर्ण परीस स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण यांनी अपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले, समाज घडवण्यासाठी महिलांना अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई यांच्या विचाराने पुढे जावे लागणार आहे. महिलांनी सबल होणे आजच्या काळाची गरज आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. समाजात पुढे वाटचाल करताना मुलींसाठी आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम सुवर्ण परिस स्पर्श फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाते.
यावेळी फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा भोसले व सातारा जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल पाटील यांनीही सर्व महिलांना व्यवसाय मार्गदर्शन व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पुनम भिसे, नुरजहॉ सय्यद, सोफिया पटवेकर आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

