फलटण : अगामी काळात आम्हाला फलटण शहर हे स्वच्छ व सुंदर बनवायचे आहे. आम्ही सतेत ‘बदला’ घेण्यासाठी नव्हे तर ‘बदलाव’ करायला आलोय. फलटण शहाराच्या विकासासाठी आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून निधी कमी पडणार नाही असे अश्वस्त करण्याबरोबरच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा क्लास घेतला यावेळी विविध मुद्द्यावर विभाग प्रमुखांचे अज्ञान उघड झाले.
फलटण नगर पालिकेतील सभागृहात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली, यावेळी रणजितसिंह व आ. पाटील यांनी नगरपालिकेच्या विभाग निहाय आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
फलटण शहराचा परिपूर्ण विकास करून सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबद्ध आहोत. शहाराच्या विकास कामासाठी आम्ही जवळपास दीडशे कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. अगामी काळात फलटण शहरात आरोग्य, स्वच्छता, स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था, आवश्यक तेथे स्वच्छतागृहे, शहरातील खुल्या जागा नगरपालिकेच्या ताब्यात घेणे, सर्वत्र काँक्रीटीकरणाचे रोड अशी विविध प्रकारची कामे आम्ही करणार आहोत, तेव्हा अगामी काळात नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
रणजितसिंहाचे महत्वपूर्ण निर्देश :
▪️ फलटण शहरात कोट्यावधी रुपये खर्चून केलेली योजना नेमकेपणाने भुयारी गटर योजना आहे की मलनि:सारण योजना आहे हे नागरिकांना समजायला हवे. योजनांची कामे नेमकी कोणाच्या भल्यासाठी होतात, ही योजना पूर्ण न होताच बिले का अदा झाली असे सवाल उपस्थित केले परंतु त्यावर समंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उत्तरे देता आली नाहीत. त्यावर या योजनेची श्वेतपत्रिका जाहीर करावी.
▪️ फलटण शहर हद्दीत किती खुल्या जागा (ओपन स्पेस ) आहेत. त्यावर क.जा.प. ( कमी जास्त पत्रक ) झाले आहे काय ? नसेल तर ते करा व सर्व खुल्या जागा अगामी अठ्ठेचाळीस तासांमध्ये नगर पालिकेच्या नावावर करून घ्या.
▪️ फलटण नगरपालिकेतील तेवीस पेक्षा जास्त कर्मचारी स्वतः काम करत नाहीत त्यांनी आपल्या जागेवर कंत्राटी कामगार नेमले आहेत, शिफारस व वरदहस्तामुळे ते काम न करता फुकटचा पगार लाटत आहेत. त्याचबरोबर जवळपास एकोणचाळीस स्वच्छता कर्मचारी संगणक प्रमुख, विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत असा खळबळजनक खुलासा विभाग प्रमुख यांनी केला, त्यावर जे कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे चांगले काम करीत आहेत, त्यांना आत घ्या व काम न करता फुकटचा पगार लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून त्यांना कमी करा.
▪️ प्रशासन आपल्या दारी उपक्रम राबविणार आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतील तर त्यांच्या दारात जाण्या शिवाय पर्याय नाही व तसा निश्चय आम्ही केला आहे. या उपक्रमाद्वारे नरपालिकेचे प्रशासन नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करेल. त्यावेळी आपण स्वतः अथवा आमदार साहेब, पदाधिकारी यापैकी कोणीही उपस्थित असू.
▪️ फलटण शहरातील ठिकठिकाणचे दिवे बंद आहेत. विशेषतः हायमास्ट दिवे गेली अनेक महिने बंद आहेत. दिवा आम्ही मंजूर करून दिला आहे तो चालू करने तुमचे काम आहे. शहरातील नागरिकांना संध्याकाळी व रात्री फिरताना आवश्यक उजेड मिळायला हवा, तेव्हा शहरातील सर्व दिवे सुरु करून घ्या.
▪️ नगर रचना विभागाबाबत नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. बिल्डर आपला पार्किंग स्पेस विकत आहेत का, नगर पालिकेने बांधकाम मंजुरी दिल्यानंतर त्याचा वापर त्याच कारणासाठी होत आहे का, असे विविध प्रश्न उपस्थित करून ठरवून दिलेल्या मानांकना प्रमाणे मंजुरी देण्यात यावी.
▪️ फलटण शहरातील कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, शहरातील रस्ते, विद्युत लोड, गटारे, कोणत्या भगत पाणी येत नाही अश्या विविध अडचणी बाबत आपण दहा दिवसानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहोत, त्यावेळी सर्वांनी व्यवस्थित माहिती घेऊन यावे.
▪️ फलटण शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली की सिग्नल व्यवस्था सुरु करण्यासाठी आरटीओ विभागाकडून चाचपणी करुन त्यावर अगामी काळात अंमलबजावणी करने आवश्यक आहे, त्या नुसार नगरपालिकेने नियोजन करावे.
माहितीपूर्ण रणजितदादा ; अनभिज्ञ अधिकारी !
फलटण नगरपालिकेत झालेल्या बैठकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विभागवार आढावा घेतला, हा आढावा घेताना त्यांनी अनेक अभ्यासपूर्ण प्रश्न विचारले परंतु बऱ्याच प्रश्नांची उत्तरे अनेक विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना देता आली नाहीत, तर काहींची उत्तरे देताना चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. फलटण नगर पालिकेत अभ्यासू लोकप्रतिनिधी बरोबर झालेली बहुदा ही त्यांची पहिलीच बैठक असावी व त्यामुळे नागरिकांसाठी काम करणारे अधिकारी अथवा कर्मचारी यांना आपल्या कामाबाबत किती ज्ञान आहे हे या निमित्ताने स्पष्ट झाले. त्यामुळे या बैठकीच्या निमित्ताने फलटण शहारातच नव्हे तर तालुक्यातही ‘माहितीपूर्ण रणजितदादा अनभिज्ञ अधिकारी’ अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.