
फलटण : फलटण येथील नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी यांच्या विद्यमाने तसेच वनविभाग फलटण, रनर्स ग्रुप, डॉक्टर्स असोसिएशन, PDA क्रिकेट कमिटी व संत घाडगे बाबा आश्रमशाळा, ताथवडे यांच्या सहकार्याने ताथवडा ता. फलटण येथील वनक्षेत्रात डोंगर परिसराला पूरक देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
रविवार दिनांक ६ जून ला आषाढी एकादशी दिवशी करण्यात आलेल्या या वृक्षारोपणा मध्ये खैर, बोर, करवंद, बेहडा, भुत्या, पांगारा आदी वृक्षांचा समावेश आहे. देशी वृक्ष तयार करुन त्यांचे योग्य जागी रोपण व संवर्धन करण्याचे कार्य नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. आपण सर्वांनी एकमेकांच्या मदतीने मोठ्या संख्येने देशी झाडांचे रोपण करून त्यांचे संवर्धन करूयात आणि निसर्ग व अन्न साखळी वाचवण्यास हातभार लावुया असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
