राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी रामभाऊ ढेकळे

फलटण : फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ नाथा ढेकळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी रामभाऊ ढेकळे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामभाऊ ढेकळे यांचे अभिनंदन केले. पक्षाच्या कामकाजात आघाडीवर राहुन काम करण्याचे आणि पक्षाची ध्येय धोरणे, पक्षाचा विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही केले.
रामभाऊ ढेकळे यांचे वडील नाथा ढेकळे त्यांच्या कार्यकाळात पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत होते, त्यांच्यानंतर रामभाऊ ढेकळे ५ वर्षे पंचायत समिती सदस्य व त्या कार्यकाळात अडीच वर्ष सभापती म्हणून त्यांनी उत्तम काम केले. श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच वाखरी, ता. फलटण या त्यांच्या गावातील ग्रामपंचायत व विकास सोसायटी मध्येही त्यांनी प्रारंभी काम केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापनेपासून सदस्य असलेले रामभाऊ ढेकळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका उपाध्यक्ष तसेच काही काळ सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणूनही काम केले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खा. नितीन पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी रामभाऊ ढेकळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पद मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा करुन ढेकळे यांना सदर पदाची जबाबदारी दिली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी रामभाऊ ढेकळे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.
माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, महानंदचे माजी उपाध्यक्ष डी. के. पवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, कृषी पदवीधर संघटनेचे हणमंतराव मोहिते, अशोकशेठ सस्ते, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिंदे, शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी रामभाऊ ढेकळे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!