बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वर्षवास काळात पठण करा : भंते सुमेध बोधी

फलटण ता. १२ : प्रत्येक गावा-गावामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे पठण करावे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे भिक्खू संघशासन राष्ट्रीय महासचिव भंते (A) सुमेध बोधी यांनी केले.
कुरवली खुर्द ता. फलटण येथे वर्षावास प्रवचन मालिका प्रारंभ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याच्या वतीने आयोजित वर्षावास कार्यक्रमाच्या प्रारंभी शील संपन्न, धम्मप्रचारक, अभ्यासू व लेण्यांचा अभ्यास करणाऱ्या संघराज निकाळजे यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या स्तुपाच्या साक्षीने वर्षावासाचा प्रारंभ आजच्या आषाढ पौर्णिमेनिमित्त होत आहे हे त्यांच्या कुशल कर्माचे फळ आहे असे स्पष्ट करून आषाढ पौर्णिमेचे महत्त्व सांगताना भंते सुमेध बोधी म्हणाले, भगवंताने पहिला धम्म उपदेश पंचवर्गीय भिक्खूंना केला. इ. स ५२८ ला संबोधी प्राप्तीनंतर भगवंतांनी पहिल्यांदा धम्माचा उपदेश केला. म्हणून या पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. बौद्ध धम्मामध्ये आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास केला जातो. बुद्धत्व प्राप्तीनंतर सात आठवडे भगवंताने एकांतात घालवले, आठव्या आठवड्यात गया ते सारनाथ प्रवास करून आषाढ पौर्णिमेला त्यांचे जे प्रथम पाच शिष्य होते त्यांना प्रथम धम्मदेसना दिली आणि धर्मचक्र प्रवर्तित झाले. यापुढे बोलताना त्यांनी सांगितले, भगवंताने सांगितलेला वर्षावास हा केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहता या काळामध्ये आत्म परिवर्तन, विवेक जागरणाचा काळ म्हणून आपण पहावे. या काळात धम्माचे चिंतन, मनन, अभ्यास, आत्मपरीक्षण व संयमाचे पालन करून प्रज्ञा,शील,समाधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या प्रति अस्सीम मंगलकामना आणि आशीर्वाद व्यक्त करतो. रोज संध्याकाळी सात ते आठ या वेळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे सामुदायिक वाचन या ठिकाणी सुरू करावे.

यावेळी भंते सुमेध बोधी यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ धम्म उपासक संघराज निकाळजे यांना भेट देऊन त्यांच्या प्रति मंगल कामना व आशीर्वाद व्यक्त केले. यावेळी नालासोपारा येथे वास्तव्यास असलेले पूज्य भंते कश्यप यांनी आदर्शांचे पूजन करून सर्वांप्रती मंगल कामना व्यक्त केली.
उपासक लक्ष्मण निकाळजे यांनी बौद्ध धम्म व आंबेडकरी चळवळीतील पुस्तकांचे दान देऊन याठिकाणी ग्रंथालय सुरू करण्याचा संकल्प आषाढ पौर्णिमे दिवशी केला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा व सातारा जिल्ह्याचे प्रभारी, राज्याचे संघटक, समता सैनिक दलाचे सहा.स्टाफ ऑफिसर, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य दादासाहेब भोसले, तालुकाध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, संस्कार विभागाचे सचिव बजरंग गायकवाड, संघटक विजयकुमार जगताप, हिशोब तपासणीस सतिश कांबळे, संरक्षण उपाध्यक्ष संपत भोसले, लक्ष्मण निकाळजे,आनंदराव निकाळजे, संघराज अहिवळे, झुंबर निकाळजे, शिलाबाई निकाळजे,सखूबाई जाधव, शाहिरा सय्यद, शारदा लोंढे, बाई जाधव, कविता जाधव, सत्यभामा जगताप, वालाबाई इंगळे, मंगला कदम, सुलोचना अहिवळे, लता अहिवळे, मोहिनी अहिवळे, उत्तम निकाळजे, फकक्ड सोनवणे, कमल अहिवळे, प्रभावती अहिवळे,निलाक्षी अहिवळे, वनिता अहिवळे, पूनम जगताप, पद्मा अहिवळे,प्रवीण इंगळे, विशाल अहिवळे, गणेश अहिवळे, पियुष अहिवले, अशोक निकाळजे, बाळासाहेब अहिवळे, राजेंद्र अहिवळे, साईबाबा अहिवळे,आबा अहिवळे, श्रीकांत अहिवळे, राजरत्न जगताप, अक्षरा जगताप, पायल जगताप, पुनम जगताप,पुर्वा जाधव, शौर्य इंगळे, स्वरा इंगळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बाबासाहेब जगताप यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!