मार्केट यार्ड फलटण येथे कांद्याचे दर तेजीत -श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीत मंगळवार दिनांक 15/10/2024 रोजी एकूण कांद्याची आवक 1408 क्विंटल झाली असून लाल कांदा दर रु.1500 ते 3700 व गरवा कांदा दर रु.2000 ते 4401 प्रति क्विंटल पर्यंत निघाल्याचे समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

मे.घडीया ब्रदर्स यांचे अडतीवर श्री.शिवाजी दगडू बोराटे, रा. पिंप्रद यांच्या कांद्याला रु.4401 प्रति क्विंटल इतका उच्चांकी भाव मिळाला असून मे.धनेश ट्रेडर्स यांनी खरेदी केला आहे अशी माहिती समितीचे व्हा.चेअरमन श्री.भगवानराव होळकर यांनी दिली.

शेतकऱ्यांनी कांदा वाळवून प्लास्टिक पिशवीत न भरता नवीन सुतळी गोणीमध्ये आणावा म्हणजे जास्तीत जास्त भाव मिळेल असे आवाहन समितीचे सचिव श्री.शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!