
फलटण : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयातर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी १५ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे, आवाहन जिल्हा परिषद सातारा येथील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी ललिता शेळके यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२५ साठीची नामांकने केंद्र शासनाच्या www.awards.gov.in या संकेस्थळावर मागविण्यात आलेली आहेत. ऑनलाईन अर्ज / नामांकने मागविण्यासाठी दि. १५ मे ते दि. १५ जुलै २०२५ या कालावधीमध्ये संकेतस्थळावर अर्ज करावयाचे आहेत. पोस्टाने किंवा समक्ष दिलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
राष्ट्रीय पुरस्काराबाबत मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाच्या www.depwd.gov.in तसेच राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक अर्जदार व्यक्तींनी दिव्यांग क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार मिळणेबाबतचे अर्ज दि. १५ जुलै पर्यंत ऑनलाईन सादर करावेत असे, आवाहन दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून करण्यात आले आहे.
