श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत

फलटण : महात्मा एज्युकेशन सोसायटीचे श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेत मोठया उत्साहात नवागतांचे स्वागत करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व मुलांना गणवेष, पाठ्यपुस्तके, गुलाब पुष्प देऊन संस्था पदाधिकारी आणि शिक्षकांनी औक्षण करून खाऊचे वाटप केले.
यावेळी संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष शांताराम आवटे, ज्येष्ठ सदस्य बापूसाहेब मोदी, श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय शाळा समितीचे अध्यक्षा अलका बेडकिहाळ, मुख्याध्यापक मनीष निंबाळकर (प्राथमिक), भिवा जगताप (माध्यमिक), सुरेखा सोनवले (बालवाडी)bआणि शिक्षक, विदयार्थी उपस्थित होते.
नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांचे नवीन शैक्षणिक वर्ष आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण जावो ही सदिच्छा व्यक्त करून आपल्या संस्थेच्या सर्वच शाखांचा गुणवत्तापूर्ण आणि शिस्तबध्द शिक्षणासाठी नावलौकिक आहे.तो वृध्दींगत व्हावा अशी अपेक्षा रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली. शांताराम आवटे, अलका बेडकिहाळ यांनी नवीन मुलांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विदयार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. मनीष निंबाळकर यांनी उपस्थित पदाधिकारी यांचे स्वागत केले. भिवा जगताप यांनी आभार मानले. दिपाली निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!