
फलटण : शहाराचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी फलटण येथे नवीन नाट्यगृहाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाले आहेत त्याचबरोबर प्रभागातील मूलभूत सुविधांच्या कामांसाठी प्रत्येक प्रभागासाठी पन्नास लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी यांनी दिली आहे.
फलटणच्या विकास कामांसाठी निधी मंजूर करून आणण्यात आमदार सचिन पटील व आपण कोठेही कमी पडणार नाहीत अशी ग्वाही नुकतीच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली होती. त्यानुसार या दोघांच्याही पाठपुराव्याला आणखीन एक यश प्राप्त झाले आहे. फलटण शहरातील प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी प्रत्येक प्रभागासाठी गटर, पिण्याची पाईप लाईन व बोळांचे काँक्रीटीकरण अशा प्रकारच्या विविध कामांसाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी एकत्रितपणे फलटण शहरातील प्रभागांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. त्यानुसार मंगळवार पेठ प्रभाग क्रमांक २-३ मधून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. या वेळी भाजपचे गट नेते अशोकराव जाधव, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, रणजित भोसले, सुधीर अहिवळे, सचिन अहिवळे, अजय माळवे, अमित भोईटे, राहूल निंबाळकर, संजय गायकवाड, अमोल भोईटे, सनी मांढरे, राजू निंबाळकर, महेश घाडगे, अमोल घाडगे, संदीप घाडगे, सुनिल घोलप, संग्राम सावंत, लतिफ तांबोळी, महेश जगताप, युवराज काकडे, प्रशांत काकडे, सुनील अहिवळे, सौरभ मोरे, सुमित काकडे, वैभव मोहिते, विशाल अहिवळे आदीसह भाजप व राष्ट्रवादीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
