जगदीश करवा यांचे दातृत्व लायन आय हॉस्पिटलला दिली १० गुंठे जागा

फलटण : फलटण मधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, लायन्स क्लबचे अध्यक्ष व सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणारे जगदीश करवा यांनी लायन आय हॉस्पिटलला पुन्हा एकदा दहा गुंठे जागा मोफत दिली आहे. या निमित्ताने त्यांचे दातृत्व पुन्हा एकदा समोर आले आहे.
दरम्यान जगदीश करवा यांचे दातृत्व सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन लायन आय हॉस्पिटलचे चेअरमन अर्जुन घाडगे यांनी केले आहे.

लायन आय हॉस्पिटलकरीता दहा गुंठे जागेचा दस्त करवा यांनी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला त्यावेळी ला. अर्जुन घाडगे बोलत होते. यावेळी माजी प्रांतपाल ला. भोजराज नाईक निंबाळकर, लायन आय हॉस्पिटलचे सेक्रेटरी ला.चंद्रकांत कदम, ला. सुहास निकम, ला. रणजीत निंबाळकर, फलटण लायन्स क्लबचे सेक्रेटरी ला. महेश साळुंखे, ला. रतनसिंहभाई पटेल आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ला. अर्जुन घाडगे म्हणाले, फलटण लायन्स क्लबचे अध्यक्ष जगदीश करवा यांच्या कार्य काळामध्ये अनेक सेवाभावी व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी कोट्यावधी रुपयांची जागा लायन आय हॉस्पिटलला दान केली आहे. समाजातील अनेक गरजु, गोरगरीब लोकांना व अनेक सेवाभावी संस्थांना ते नेहमी मदतीचा हात देत असतात. त्यांच्यामध्ये असणारे दातृत्व वाखाणण्यासारखे व इतरांना प्रेरणादायी आहे. लायन्स क्लबचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जगदीश करवा यांची वाटचाल नेहमीच सामाजिक भावनेची राहिली आहे. गोरगरिबांना मदत करण्यात व सामाजिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात. फलटण लायन्स क्लबच्या माध्यमातून लायन्स आय हॉस्पिटल चालवण्यात येते. या आय हॉस्पिटलची सुसज्ज इमारत करवा यांच्या मदतीमुळे उभी आहे. या इमारतीसाठी लागणारी दहा गुंठे जागा यापूर्वी त्यांनी दान केली होती, पुन्हा आता नव्याने त्यांनी या आय हॉस्पिटल साठी दहा गुंठे जागा दान केल्याने त्यांचे दातृत्व पुन्हा एकदा समोर आले आहे.
“गरजेपेक्षा जास्त पैसे मिळाले तर त्यातील काही पैसे एका विश्वस्ताप्रमाणे समाजातील गरजू लोकांना देणे हे माझे कर्तव्य समजतो आणि याच भावनेतून माझ्या परीने मला जेवढं शक्य असेल तेवढे मी मदत करीन करण्याचा प्रयत्न करीत असतो”
ला. जगदीश करवा
अध्यक्ष, लायन्स क्लब, फलटण

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!