
फलटण : शिवसेनेचे मुख्यनेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख नानासो इवरे यांनी उत्साहात व विविध उपक्रमांद्वारे साजरा केला. यावेळी आश्रम शाळेला वॉटर फिल्टर तर वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना फळ वाटप करण्यात आले.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने नानासो इवरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुरवली ता. फलटण येथील जेष्ठ नागरीक संघाच्या ओंकार वृध्द्धाश्रम येथे फळ वाटप केले. यावेळी आश्रमातील व्यवस्थापन व सर्व सदस्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आर्शिवाद दिले. त्याच बरोबर अलगुडेवाडी ता. फलटण येथील पांचपांडव आश्रम शाळेतील सुमारे पावणे तीनशे विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे व त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आश्रम शाळेला पाणी शुद्धीकरण यंत्र ( वॉटर फिल्टर ) देण्यात आला.

कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका प्रमुख नानासो इवरे, संजय गांधी निराधार योजना सदस्य सुखदेव फुले, पवारवाडीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पवार, उप तालुकाप्रमुख सुभाष पवार, लक्ष्मण गोडसे, राजाभाऊ गोफणे, संपत पवार, उमेश भगत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

