
फलटण : फलटण तालुका विश्वब्राम्हण सोनार समाजाच्या वतीने आज शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी फलटण येथे उपळेकर महाराज समाधी मंदिर फलटण येथे संत नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
सदर उत्सवात सकाळी ९ वाजता भजन, ११ वाजता प्रतिमा पूजन, साडेअकरा वाजता संत नरहरी गाथा, दुपारी १२ वाजता मुख्य कार्यक्रम, दुपारी साडेबारा वाजता संतांची शिकवण, दुपारी एक वाजता महाप्रसाद या प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, तरी फलटण शहर आणि परिसरातील सोनार समाज बांधवांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
