प्रा. नितीन नाळे ‘राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्काराने’ सन्मानित

फलटण : फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील प्रा. नितीन नाळे यांना पुणे येथे समारंभपूर्वक ‘राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्काराने’ मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त समृद्धी प्रकाशन, सिंधुदुर्ग, विसावा सोशल फाउंडेशन, पुणे, हिरकणी महिला विकास संस्था, पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील पत्रकार भवन येथे यहा पुरस्कार सोहळा पार पडला.
या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, अभिनेता ध्रुव दातार, साहित्यक संजय कुलकर्णी, शरद गोरे, प्रा. डॉ. बी.एन.खरात, संदीप राक्षे, स्वाती तरडे, प्रा. निरज अत्राम, विनोद देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रा. नितीन नाळे यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, पर्यावरण प्रबोधन अशा विविध करायची दाखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रा. नितीन नाळे यांनी आजवर शिक्षण, साहित्य, पर्यावरण जागृती, व्यक्तिमत्व विकास, समाज प्रबोधन, काव्य संस्कृती अशा विविध विषयांवर एक हजार ६७ व्याख्याने राज्यभरात दिली आहेत. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
कार्यक्रमास आर्यन नाळे, सचिन जमदाडे, आनंदराव शिंदे, निरज अत्राम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. नितीन नाळे यांचे शैक्षणिक, साहित्य, कला व क्रीडा, सामाजिक, राजकीय व अन्य क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!