फलटण : महाराष्ट्र माळी समाज महासंघ,तसेच महामित्र पाक्षिक परिवार यांच्यावतीने फलटण येथे राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर पालक परिचय मेळाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक दशरथ फुले यांनी दिली आहे.
रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी महाराजा मंगल कार्यालय, रिंग रोड, फलटण, जि.सातारा येथे
सकाळी दहा ते दुपारी चार या कालावधीत सदर मेळावा पार पडणार आहे. गेल्या तेहतीस वर्षापासुन महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने फलटण येथे माळी समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
गेल्या तेहतीस वर्षात फलटण येथे होत असलेल्या मेळाव्याचा लाभ राज्यातील अनेक वधु-वरांनी व त्यांच्या पालकांना झाला आहे. सदर मेळाव्याच्या माध्यमातुन आजवर पाच हजाराहुन अधिक विवाह जुळून आले आहेत, पालक वर्गाचा मोठ्या प्रमाणात आपआपसात परिचय वाढला आहे. या वधु-वर परिचय मेळाव्यामुळे फलटण तालुक्यामध्ये सामाजिक संघटनेस गती व बळकटी मिळाली असुन आज फलटण हे राज्यातील वधु-वर मेळाव्याचे प्रमुख केंद्र बनले आहे.
फलटण येथील मेळाव्याची प्रेरणा घेऊन राज्यात अनेक ठिकाणी मेळावे घेतले जात आहे व त्याचा फायदा वधु-वरांना व त्याच्या पालकांना होत आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी फलटण या ठिकाणी भेटी देऊन मेळाव्याचे उद्घाटन केले असुन या हि वर्षी मान्यवरांना निमंत्रित करून त्याचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. तरी या मेळाव्याचा लाभ माळी समाजातील प्रथम वधु-वरांनी तसेच विधवा, विधूर, घटस्फोटीत, वधु-वरांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.