पाडेगाव फार्म येथे कृषिदुतांनी दिले पपईजाम निर्मितीचे प्रात्यक्षिक

फलटण : तालुक्यातील पाडेगाव फार्म येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी “ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५” कार्यक्रमा अंतर्गत गावातील शेतकरी व महिलांना कृषिदुत आर्यन जगताप, विराज तोडकर, प्रतीक चौधरी, प्रज्वल यादव, अमित फाळके, सुजित म्हेत्रे, निखिल गोवेकर यांनी फळांचे जाम बनविण्याचे प्रात्यक्षिक दिले.
त्याचबरोबर फळांची उपलब्धता, फळांची प्रकिया, चवीसाठी, काढणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी तसेच दीर्घ काळासाठी साठवणूक करण्यासाठी जाम बनविला जातो व त्यांचे दर वाढविण्याचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमासाठी चैत्राली रासकर, वैष्णवी जाधव, राणी जाधव, सगुणा जाधव, मनीषा नाळे, सविता जाधव, सारिका घोरपडे, भारती घोरपडे, मंगल जाधव, उषा घोरपडे, कार्तिकी जाधव आदी महिलांची उपस्थिती होती.
कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, प्रा. संजय अडत सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!