मूकबधिर विद्यालयाची समृध्दी कांबळे चित्रकला स्पर्धेत प्रथम ; याशनी नागराजन यांच्या हस्ते गौरव

फलटण : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कल्याण जि.प.सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत महात्मा शिक्षण संस्था संचलित, मूकबधिर विद्यालय गोळेगाव, ता. फलटणची दिव्यांग विद्यार्थीनी कु.समृद्धी गणेश कांबळे हिचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, सातारा जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजयकुमार चल्लमवार, सातारा जिल्हा समाज कल्याण वै.सा.का. शेळके इत्यादी मान्यंवर या प्रसंगी उपस्थित होते.
महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालय फलटण हे सातारा जिल्ह्यातील नामांकित मूकबधिर मुलांची शाळा असून या विद्यालयामार्फत दिव्यांग मुलांना सर्व त्या अत्याधुनिक सोयी सुविधा पुरविल्या जातात.
३ डिसेंबर ते १० डिसेंबर दरम्यान हा आठवडा हा संपूर्ण देशभर “अपंग सप्ताह” म्हणून पाळण्यात येतो. या दरम्यान दिव्यांग क्षेत्रातील मुला मुलींसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा अपंग सप्ताह पाळण्यात येतो. या सप्ताह निमित्त दिव्यांग मुलांसाठी निबंध, हस्ताक्षर, चित्रकला अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!