फलटण : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सातारा विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाचा विद्यार्थी पै. सुरज गोफणे याने एकसष्ठ किलो वजन गटात फ्री स्टाईल क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकविले आहे.
बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटण येथे सदर स्पर्धा संपन्न झाल्या. सदर यशाबद्दल सुरज गोफणे याचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.