फलटण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यता प्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषिदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत पाडेगाव ता. खंडाळा येथे शेतकऱ्यांच्या कृषी संवाद मंचाची निर्मिती केली आहे.
धनंजय इंगोले, राहुल केसकर, शिवतेज रणवरे, सौरभ काटकर, रोहन कांबळे, श्रीजीत धुमाळ, आदित्य गोडसे या कृषी दूतांनी गावातील शेतकऱ्यांचा सोशल मिडीयावर व्हाट्सॲप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपद्वारे शेतकऱ्यांना अंतर्गत पिक उत्पादन, रोग व किडींचे निवारण, सरकारी योजनांची माहिती व प्रसार, प्रगतशील शेतकऱ्यांची यशोगाथा, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान, शेती निगडित समस्यांची निवारणबद्ध माहिती व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या वेळी रमेश धायगुडे, दत्तात्रय धायगुडे, अंकुश माने, सुहास माने, आदित्य माने, नाना मोटे, सिद्धार्थ माने, सुयोग सोनलकर, पियूष पांडुळे, शंकर मर्दानी, पोपट धायगुडे, अनिल धायगुडे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी दूतांना याकामी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, सर, प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितिशा पंडित, प्रा. निलिमा धालपे यांचे मार्गदर्शन लाभले.