सचिन पाटील यांच्या मताधिक्यात धुळदेवचा खारीचा वाटा – बाळासाहेब ननावरे

फलटण : फलटण विधानसभा मतदार संघातील यंदाची निवडणुक ऐतिहासिक व परिवर्तनाची ठरली आहे. या निवडणुकीत विजयी झालेल्या आमदार सचिन पाटील यांच्या विजयात धुळदेव ग्रामस्थांचाही खारीचा वाटा असल्याचे, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब ननावरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
फलटण विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार दीपक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील यांच्यात अटितटीचा सामना झाला. या लढतीत सचिन पाटील यांनी दीपक चव्हाण यांच्यावर सतरा हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला. फलटण शहारालगत असलेल्या धुळदेव ग्रामपंचायत व विकास सोसायटीवर गेली तीस वर्षे एकाच पक्षाची एकहाती सत्ता आहे, या निवडणुकीत पूर्ण ताकद संबंधित पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी होती. परंतु असे असतानाही आमच्यासह धुळदेव मधील अनेक सामान्य कार्यकर्ते, शेतकरी, महिला, तरुण वर्ग यांनी नेटाने प्रचार केल्याने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखालील उमेदवार सचिन पाटील यांना गावातून मताधिक्य मिळाले. धुळदेव गावामध्ये या निवडणुकीसाठी एक हजार ९३५ एवढे मतदान झाले होते. निकालानंतर पाटील यांना गावामधून २७४ मतांचे मताधिक्य मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. अगामी काळातील ही परिवर्तनाची नांदी असल्याचे स्पष्ट करून सदर मताधिक्य दिल्याबद्दल बाळासाहेब ननावरे यांनी धुळदेव ग्रामस्थ व मतदार यांना धन्यवाद दिले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!