फलटण : इटली येथील रोम शहरात पार पडणाऱ्या ‘विंटर ऑलिम्पिक गेम्स २०२६’ मध्ये डॉ. रोहन अकोलकर यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी सोपाविण्यात आली आहे. ‘विंटर ऑलिम्पिक गेम्स २०२६’ या स्पर्धेत बर्फावर खेळल्या जाणाऱ्या खेळांचा समावेश आहे.
या विंटर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बर्फवरील खेळ खेळत असताना खेळाडूला श्वसनाचे त्रास होतात, दुखापत होते, स्नायू व मांस पेशींना इजा होते, म्हणून खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. या वैद्यकीय पथकात डॉ. रोहन अकोलकर यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकाद्वारे स्पर्धेतील खेळाडूंना होणारे श्वसनाचे आजार आणि मांसपेशींना इजा होतात, तसेच श्वसनाबरोबर हृदयावर येणारा ताण व त्यातून निर्माण होणारा धोका वेळेमध्ये ओळखणे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर उपचार सुरु करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी डॉ. रोहन अकोलकर यांच्यावरती या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सोपविण्यात आली आहे. त्याच बरोबर खेळाडूंना इजा होऊ नये याची काळजी घेण्या बाबतचे मार्गदर्शनही डॉ. अकोलकर हे करणार आहेत.
फिफा इंटरनॅशनल ऑलिम्प मेडिकल कमिटी मेंबर असणाऱ्या डॉ रोहन अकोलकर यांनी झुरिच स्वित्झर्लंड येथून फिफा स्पोर्टस् मेडिसीन डिप्लोमा, IOC डिप्लोमा ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन, लॉसान, सिंगापूर येथून स्पोर्ट मेडिसीन मध्ये पीएचडी, फिनलंड येथून फेलोशीप पोडियाट्रिक्सचे शिक्षण घेतले आहे. रशिया व कतार येथे झालेल्या फिफाच्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये फिजियोथेरेपिस्ट म्हणून सहभागी होणारे ते देशातील पहिले स्पोर्टस फिजियोथेरेपिस्ट ठरले आहेत.