कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील ज्येष्ठांचा शंभर टक्के मतदान करण्याचा निर्धार

फलटण : कुरवली खुर्द ता. फलटण येथील
वृध्दाश्रमातील सर्व जेष्ठ नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कुरवली येथील वृद्धाश्रमात मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा निर्धार करण्यात आला आहे.
यावेळी येथील जेष्ठ नागरिकांनी जागरुक मतदार लोकशाहीचा आधार, मतदान हा अधिकार नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदानासाठी वेळा काढा व आपली जबाबदारी पार पाडा, चला मतदान करुया लोकशाही रुजवुया, अठरा वर्षाचे वय केले पार मिळाला मतदानाचा अधिकार, आपले मतदान लोकशाहीचा प्राण, अशा आशयाचे फलक हाती घेऊन जनजागृती केली. या प्रसंगी वृद्धाश्रमातील सर्व जेष्ठ पुरुष व महिलांनी शंभर टक्के मतदान करणार असल्याचे निर्धारपूर्वक सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!