फलटण मध्ये ‘मतदानाचा हक्क बाजावणार स्वाक्षरी मोहीमेचा’ शुभारंभ

फलटण : येथील सजाई गार्डन फलटण येथे मी मतदान करणार स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नोडल अधिकारी स्वीप सचिन जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. फलटण विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान हक्क बाजवण्यासाठी घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहनही ढोले यांनी यावेळी केले.
स्वाक्षरी मोहीमचे फलक फलटण शहरातील गर्दी असणाऱ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. त्यावर नागरिकांना ‘मी मतदान करणार स्वाक्षरी’ या उपक्रमांतर्गत स्वाक्षरी करता येणार आहेत. मतदारांमध्ये मतदान जनजागृती व्हावी या साठी अशा अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!