
फलटण : महात्मा फुले समता परिषद सातारा जिल्हा शाखेची सर्वसाधारण सभा रविवार दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडे दहा वाजता संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, फलटण येथे आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. बी. के. यादव यांनी कळविले आहे.
सदर सभा महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र उपाध्यक्ष शंकरराव लिंगे तथा आण्णा यांचे अध्यक्षतेखाली होणार असून सातारा जिल्हा माजी अध्यक्ष दशरथ फुले व राजेंद्र नेवसे, डॉ. बाळासाहेब शेंडे, प्रा. संपतराव शिंदे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी फलटण, खंडाळा, माण, खटाव, कोरेगाव, वाई या तालुक्यातील तालुकाध्यक्ष तसेच जिल्हास्तरावर काम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सर्वानुमते करण्यात येणार आहेत. तरी सर्व समता सैनिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन समता परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

