
फलटण : तालुक्यातील गोखळी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने ‘रक्त घ्या पण बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात या करिता व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते गणेश गावडे यांच्या मातोश्री स्व. संगिता गावडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग मानधन वाढ व अन्य १७ मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी गोखळी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये ६४ रक्तदात्यानी रक्तदान केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती यांच्या माध्यमातून सदर रक्त संकलन करण्यात आले.
शिबिराचा प्रारंभ ओंकार गिरी गुरू इच्छागिरी महाराज यांच्या व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य समन्वयक गौरव जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष मंगेश ढमाळ, डॉ. शिवाजी गावडे, राष्ट्रवादीचे शंभूराज खलाटे, शिवसेनेचे विकास नाळे, स्वाभिमानीचे धनंजय महामुलकर,नितीन यादव, भाजपाचे बजरंग गावडे, रासपचे संतोष ठोंबरे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष बापूराव गावडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज गावडे, विश्वासदादा गावडे, मारुती गावडे, बजरंग खटके, संतोष खटके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या वेळी करण गावडे, ज्ञानेश्वर गावडे, शंतनु जाधव, सुरज गावडे, वैभव भोसले, दिलावर काझी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या करण्यात आला. खटकेवस्तीचे पोलिस पाटील राजेंद्र धुमाळ यांची फलटण तालुका पोलिस पाटील संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ह.भ.प. सुजित गावडे महाराज यांनी केले. आभार सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी मानले.
कार्यक्रमास गोखळी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
