
फलटण : बांधकाम कामगार, लाडकी बहीण, वयोश्री, संजय गांधी निराधार योजनेसह अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थी कुटुंबांचा स्नेह मेळावा व स्नेहभोजनाचे आयोजन महायुतीच्या वतीने फलटण येथे करण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक १९ जून रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातील मारवाड पेठ येथील नवलबाई मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्नेह मेळाव्याचा शुभारंभ माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्याचे अध्यक्षपद आमदार सचिन कांबळे-पाटील हे भूषविणार आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर व मनिषाताई नाईक निंबाळकर या स्वागताध्यक्ष पद भूषवणार आहेत. ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, शिवसेनेचे फलटण तालुकाध्यक्ष नानासो इवरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगरसेवक सुदामआप्पा मांढरे, अनुप शहा, फिरोज आतार व अजय माळवे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

