श्रीराम नवमीनिमित्त उपळेकर महाराज मंदिरात रामरक्षा पठण ; गुढीपाडव्यापासून शुभारंभ

फलटण : श्रीराम नवमीचे औचित्य साधून येथील प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिरात गुढीपाडवा ते श्रीराम नवमी या कालावधीत रामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक उपक्रमात श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
रविवार, दिनांक ३० मार्च २०२५ (गुढीपाडवा) ते दिनांक ६ एप्रिल २०२५ (श्रीराम नवमी) या दरम्यान आयोजित उपक्रमात दररोज सायंकाळी ५ : ३० वाजता उपळेकर महाराज मंदिरात तेरा वेळा रामरक्षा पठण होणार आहे. उपक्रमात सहभागी होताना भाविकांनी रामरक्षेचे पुस्तक घेऊन यावे, असेही आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहेे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!