
फलटण : पुणे विभागातील अल्पसंख्य व सर्वधर्म समभाव रूजविणे, वसुधैव कुटुंबकम ही भावना निर्माण करून अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले याला आळा घालण्यासाठी उपाययोजना सूचविणे या विषयी चर्चा करून अल्पसंख्याक समुदायावरील हल्ले तसेच नोंद होत असलेले द्वेष गुन्हे (Hate Crime) यांना आळा घालण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी पुणे विभागस्तरावर सर्वधर्मिय बैठक शुक्रवार ता. ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे.
या बैठकीसाठी सातारा जिल्ह्यातील संबंधित शासकीय अधिकारी, अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधी, इतर सर्व धर्मियांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, विविध धर्मियांचे धार्मिक व्यक्ती (संत, पुजारी, मौलाना, मौलवी, फादर इ.) शिक्षण तज्ञ यांनी सदर बैठकीसाठी कॉन्फरन्स हॉल, महिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे उपस्थितीत, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
