
फलटण : रक्षक रयतेचा न्यूज अंतर्गत महिला मंच, चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड फलटण शाखा, माळजाई मंदिर उद्यान समिती फलटण आणि नवनिर्माण सेवा संघ फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक १० मार्च रोजी माळजाई मंदिर येथे दुपारी साडेतीन वाजता सदर स्पर्धा संपन्न होणार आहेत. यावेळी स्लो बाईक क्वीन स्पर्धा, साडीमध्ये जलद चालणे, साडीमध्ये उलट दिशेने चालणे (रेट्रो वॉकिंग) आदी स्पर्धा महिलांसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्पर्धा प्रकारासाठी ५० रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. स्पर्धेतील स्लो बाईक क्विनसाठी सोन्याची नथ, पैठणी व लेडीज हेल्मेट अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे आहेत. साडी मध्ये जलद चालणे प्रकारात पैठणी, फार्मिंग ठुशी व टिफिन बॉक्स अशी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे आहेत. उलट दिशेने साडीमध्ये चालणे (रेट्रो वॉकिंग) साठी पैठणी, चांदीचे नाणे व व्ह्याक्यूम फ्लास्क सेट अशी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे आहेत. स्पर्धेसाठी उपस्थित राहणाऱ्या महिलांना प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन सौ. निशा मुळीक यांच्यावतीने पैठणी आणि अनेक बक्षिसे लकी ड्रॉ द्वारे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेसाठी शनिवार दिनांक ८ मार्च पर्यंत नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. नाव नोंदणीसाठी ९२२६७२०८८१, ९७६६०००३२०, ९९६०४६०५०, ७०२०४६७६८२, ९४२०९९९९१७, ८०१०२३९०६२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

