
फलटण : फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत फलटण येथील मोरया हॉस्पिटलच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सौ. पुनम जनार्दन पिसाळ यांनी महिला एकेरी व मिश्र दुहेरी सामन्यात विजेतेपद पटकाविले.
चूरशीची लढत झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही सेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत डॉ. पुनम पिसाळ यांनी विजय मिळविला. त्याचबरोबर मुधोजी क्लब, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत डॉ. पुनम पिसाळ व योगेश शेलार यांनी मिश्र दुहेरीच्या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. त्यांच्या या यशाबद्दल फलटण डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, व खजिनदार तसेच सर्व सभासदांनी अभिनंदन केले आहे.

