
फलटण : फलटण तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांनी २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत शिधापत्रिकेत समाविष्ट असलेल्या सर्वांच्या आधारकार्डचे सत्यापन (व्हेरीफीकेशन) रास्तभाव दुकानात करून घ्यावे असे आवाहन तहसिलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार फलटण तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शिधापत्रिका धारकांनी आपल्या शिधापत्रिकेमध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत. त्या सर्वांचे आधारकार्ड घेऊन आपल्या रास्तभाव दुकानदाराकडे जाऊन २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्यांचे सत्यापन (व्हेरीफीकेशन) करुन घेणे सक्तीचे आहे. ज्या व्यक्तींचे आधार सत्यापन होणार नाही, त्यांचे नाव शिधापत्रिकेमधून वगळले गेल्यास किंवा त्यांचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिधापत्रिका धारकाची राहणार आहे. तसेच शिधापत्रिका मधील जे सदस्य मयत आहेत परंतु त्यांचे नाव अद्याप शिधापत्रिकेतून वगळण्यात आले नाही, अशा सदस्यांचे नाव कमी करुन घेण्यासाठी मयत व्यक्तीचा मृत्युचा दाखला, आधारकार्ड व शिधापत्रिका घेऊन तात्काळ तहसिल कार्यालय फलटण (पुरवठा शाखा) येथे संपर्क साधावा, असे आवाहन तहसिल कार्यालय, फलटण यांच्यावतीने करण्यात आले आहे.

