फलटण : भारतीय प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवताना भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्याय यावी तसेच संविधान उद्दिशीकेचे वाचन करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा भीमसैनिक हरीश उर्फ आप्पा काकडे यांनी निवेदणाद्वारे केली आहे. आपली मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात हरीश काकडे यांनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. २६ नाव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान संविधान सभेला सादर केले, तो दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच दि. २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधानाचा अंमल चालू झाला, म्हणजेच भारत प्रजासत्ताक झाला. त्या दिवसाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकविण्यात येत असतो. परंतु आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज शासन व प्रशासनाला विसर पडलेला दिसत आहे, म्हणून ‘प्रजासत्ताक दिनी’ राष्ट्रध्वज फडकविताना भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून व संविधान उद्देशीकेचे सामुहीक वाचन करण्यात यावे, तसे न झाल्यास आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशाराही काकडे यांनी निवेदनामध्ये दिला आहे.