फलटण : फलटण तालुक्यात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नानासाहेब इवरे करीत असलेले कार्य प्रशंसनीय आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येत असलेल्या दिनदर्शिकेत विविध योजना, विविध प्रकारचे दाखले, शासकीय योजना याबाबतची अतिशय चांगली माहिती आहे, म्हणूनच फलटण तालुका शिवेसेनेची दिनदर्शिका सर्वसामान्य जनतेसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिती करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
फलटण तालुका शिवसेना दिनदर्शिकेमध्ये जातीचा, शेतकरी, नॉन क्रिमिलेयर, डोमासाईल, इडब्लूएस, उत्पन्न अशा विविध प्रकारचे दाखले कसे मिळवावेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, इंदिरा गांधी, संजय गांधी निराधार योजना अश्या विविध
शासनाच्या योजनांची माहिती व त्यांचे लाभ कसे मिळवावेत याबाबतची महत्वपूर्ण माहिती असल्याने ही दिनदर्शिका निश्चितपणे उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारचा उपक्रम राबविल्याबद्दल नानासो इवरे यांचे विशेष कौतुक केले.