फलटण : ग्राहकांची विविध मार्गांनी होत असलेली फसवणूक होऊ नये या साठी ग्राहक संघटनांकडून ग्राहक जागृतीचे महत्वपूर्ण कार्य होत आहे, अशा कार्यास आपले सदोदीत सहकार्य राहील असे आश्वासन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्यावतीने स्वागत करण्यात आले, त्यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी सदर आश्वासन दिले. यावेळी पुणे विभागाच्या संघटिका सुनिता राजेघाटगे, संघटनेचे सल्लागार व जेष्ठ मार्गदर्शक रंगनाथ जाधव, जिल्हा सचिव मोहन घनवट, जिल्हा खजिनदार नंदकुमार काटे यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी सुनिता राजेघाटगे व त्यांच्या सहकाऱ्यानी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना संघटनेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली त्याचबरोबर पुष्पगुच्छ व ग्राहक मार्गदर्शक पुस्तिका देऊन त्यांचे स्वागत केले.