ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी खेळाडूंचा  होणार सत्कार

फलटण :  ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारत देशाला सन १९५२ साली पहिले पदक मिळवून देणारे सातारा जिल्हाचे सुपुत्र स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिन (दि. १५ जानेवारी) हा “राज्य क्रीडा दिन” म्हणून साजरा केला जातो.  दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय प्राविण्य प्राप्त खेळाडू व राज्य क्रीडा पुरस्कार्थीचा ट्रॅकसूट, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सातारा यांच्यावतीने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी दिली आहे.
दिनांक १५ जानेवारी, २०२४ रोजी राज्य क्रीडा दिन व ऑलिम्पिकवीर कै.पै. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी आयोजित करण्यात येणा-या सत्कार समारंभाकरिता सन २०२३-२४ (०१ जुलै, २०२३ ते ३० जून, २०२४) या शैक्षणिक वर्षातील शालेय व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने मान्यता दिलेल्या अधिकृत एकविध संघटनांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये तसेच भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू, राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित खेळाडू/कार्यकर्ता यांनी प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह विहित नमुण्यातील आपले अर्ज दिनांक ६ जानेवारी, २०२४ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावे.
संघटनांच्या स्पर्धातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी अर्ज सादर करताना, अर्जासोबत जिल्हा संघटनेची शिफारस असणे बंधनकारक आहे. तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी तारळकर यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!