फलटण : फलटण तालुका शिक्षक संघाच्या महिला आघाडीच्या तालुका कार्यकारिणीच्या निवडी करण्यात आल्या असून त्यामध्ये तालुका अध्यक्षपदी सौ. भारती धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे.
फलटण तालुका शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष बळवंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनात सदर निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
या वेळी महिला आघाडीच्या जाहीर झालेल्या निवडी पुढीलप्रमाणे –
भारती धुमाळ (तालुकाध्यक्ष), सुरेखा निंबाळकर (कार्यकारी अध्यक्ष), माधुरी सोनवलकर (कार्याध्यक्ष), वनिता शिरतोडे (सरचिटणीस), सीमा जाधव (कोषाध्यक्ष), सविता आगवणे (संपर्कप्रमुख), शैला पिसे (प्रसिद्धीप्रमुख), शुभांगी रणवरे (उपाध्यक्षा), धनश्री वारे (उपाध्यक्षा), संगिता वारे (उपाध्यक्षा), छाया गावडे (उपाध्यक्षा), सौ. मिनाक्षी नवले (उपाध्यक्षा), कांचन मुळीक (उपाध्यक्षा), सारिका आटोळे (उपाध्यक्षा), वैशाली चोरमले (उपाध्यक्षा), तृप्ती गायकवाड (उपाध्यक्षा), सुनीता बोधे (प्रवक्त्या, नेत्या म्हणून सौ छाया जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
सदर निवडीबद्दल भारती धुमाळ यांचा व नूतन कार्यकारिणीचा संभाजीराव थोरात यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व्यक्त होत आहे.