फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पदविका विभागामधील विविध शाखेतील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजिवराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेनुसार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदविका विभागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा पार पडणार आहेत. स्पर्धेचा शुभारंभ फार्मसी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. विक्रम देशमुख यांच्या हस्ते व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. नार्वे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सदर स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉल (मुले, मुली), बुद्धिबळ (मुले, मुली), टेबल टेनिस, (मुले-मुली) कॅरम, (मुले -मुली ) आदी सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारांचा समावेश असणार आहे. स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेते व उपविजेते खेळाडू यांना प्राविण्य प्रमाणपत्र आणि ट्रॉफी, मेडल दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी पदविका विभाग खेळ समन्वयक प्रा. एन. के. कदम, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. शेंडगे टी. एम. व खेळ समन्वयक शिक्षक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिमखाना विभाग समितीने केले आहे.