फलटण : फलटण शहरामध्ये गेल्या आठवड्यात विरोधकांनी श्रीमंत रामराजे व मी मंजूर केलेल्या दहावा घाट शेजारी बाणगंगा नदीवरील बॉक्स सेल पुलाचे भुमिपूजन करुन न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असून फलटण नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून असले उद्योग करणे थांबवावे असा इशारा माजी आमदार दीपक चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व माझ्या प्रयत्नातून फलटण नगर परिषद, फलटण हद्दीतील १) वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत वेलणकर दत्त मंदिर ते नेहरु चौक ते कॉलेज रोड दत्त मंदिर रस्ता करणे रु.४५ लक्ष. २) वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक ६ मधील शनिनगर बाणगंगा नदी संरक्षक भिंत बांधणे रु.१ कोटी ५० लक्ष. ३) अर्थसंकल्पीय नाबार्ड-२९ मधून बाणगंगा नदीवरील दहावा घाट बॉक्स सेल पूल बांधणे. रु.१ कोटी ८९ लक्ष ३५ हजार.वरील कामे मंजूर करुन आणली आहेत व ती प्रत्यक्षात चालू झाली आहेत असे शेवटी प्रसिद्धी पत्रकामध्ये दीपक चव्हाण यांनी म्हटले आहे.