फलटण : श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल, शेती शाळा, जिंती नका, फलटण येथे दि. दोन जानेवारी ते सहा जानेवारी २०२५ या कालावधीत ‘श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५’ चे आयोजण करण्यात आले असल्याची माहिती फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
या वेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्रा. अरविंद निकम, प्रा. सागर निंबाळकर, प्रा. यु. डी. चव्हाण यांची उपस्थिती होती.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये :
▪️ दीडशेहून शेती निगडीत कंपन्यांचा सहभाग
▪️ नामांकित ट्रॅक्टर कंपनी, शेती औजारे, सेंद्रिय शेती, पशुधन, पशुसंवर्धन व संगोपन, डेअरी, पोल्ट्री, बीन पॉलीहाऊस, ठिबक, स्प्रिंकलर, पीव्हीसी पाईप्स, कृषीपंप, बीज व रोपे, नर्सरी, सेंद्रिय शेती, गांडूळ व शेण खते, जैविक तंत्रज्ञान, कृषी उत्पन्न व अर्थसहाय्य कृषी उपयोगी पुस्तके यांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार
▪️ फळे, भाजीपाला प्रक्रियेतील नव्या संधी व त्या बाबतची शास्त्रशुद्ध माहिती
नवीन संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान याबाबतची माहिती
घरगुती वस्तू खरेदी करण्याची सुवर्णसंधी
प्रदर्शनाचे फायदे :
▪️ शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाची ओळख
▪️ स्वतःचे उत्पादन विकण्याची संधी
▪️ शेतीतील नवीन उत्पादनांची ओळख
▪️ अतिरिक्त माहितीसाठी परिसंवाद
▪️ समस्यावरील समाधान
▪️ शेतीतज्ञांशी संवाद साधण्याची संधी
▪️ भविष्यातील शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
(A I Technology ) बाबत चर्चासत्र
स्टॉलची रचना :
या प्रदर्शनात एकूण तीनशे पेक्षा अधिक स्टॉल लागणार असून बचत गटासाठी व खाद्य पदार्थांसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त नर्सरी विभाग, विशेष डेमो विभाग व परिसंवाद विभागाचीही निर्मिती करण्यात आली आहे.
“याभागातील शेतीदेखील प्रगत व्हावी हा आमचा दृष्टिकोन आहे. बऱ्यापैकी आपली शेती नापीक होत आहे. त्या दृष्टीने काही प्रयोग आम्ही करणार आहोत. या प्रदर्शनाद्वारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा व्हावा या हेतूने सदर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढच्या वर्षी हेच प्रदर्शन आम्ही लाईव्ह घेणार आहोत, त्यामध्ये शेतकऱ्यांना तयार पीकांचे डेमो प्लॉट पाहायला मिळणार आहेत. प्रत्यक्षात त्याचे उत्पादन किती होईल, कशा प्रकारची पीके आहेत हे शेतकऱ्यांना पाहायला मिळेल.”
संजीवराजे नाईक निंबाळकर