फलटण : इस्लामपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी चौदा वर्षाखालील वयोगटांमध्ये विजेतेपद पटकाऊन नेत्र दीपक खेळाचे प्रदर्शन करत उलेखनीय कामगिरी केली आहे.
दरम्यान एकाच वयोगटामध्ये एकाच शाळेच्या संघाने सलग तीन वेळा राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवण्याची कामगिरी करणारे मुधोजी हायस्कूल एकमेव ठरले आहे.
या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात पुणे संघाचा ४-० असा पराभव करून मुलींच्या संघाने विजेतेपद पटकवले आहे.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये वेदिका वाघमारे, गायत्री खरात, अनघा केंजळे, केतकी बोळे, इशिका कर्णे यांनी आघाडी फळीमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गोल नोंदवले. आघाडी फळीमध्ये तनिष्का लोंढे, दूर्वा साळुंखे, ध्रुवी फडतरे, आराध्या सपाटे , साक्षी चव्हाण यांनी, मधल्या फळीमध्ये मानसी पवार, गौरी हिरनवाळे, श्रावणी ननवरे, वेदिका सोनवणे, नंदिनी शिंदे यांनी, बचाव फळीमध्ये मृण्मयी घोरपडे, आर्या महांगडे व गोलकीपर आरोही पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या स्पर्धेमधून महाराष्ट्र संघ निवडण्यात आला यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी कुमारी वेदिका वाघमारे कुमारी मानसी पवार यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली तसेच आरोही पाटील व मृण्मयी घोरपडे यांची पहिल्यांदा निवड झाली आहे.
या संपूर्ण राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या चौदा वर्षाखालील मुलींच्या संघाने निर्विवाद वर्चस्व राखले व सर्व स्पर्धेमध्ये विरोधी संघाचा एकही गोल होऊन दिला नाही हा देखील एक नवीन विक्रम या संघाने केलेला आहे.
सर्व यशस्वी खेळाडूंना ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे, हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ तसेच संघाचे व्यवस्थापक बी.बी खुरंगे व धनश्री क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेता संघातील यशस्वी खेळाडू व त्याना मार्गदर्शन करणारे क्रीडा प्रशिक्षक यांचे विधान परिषदेचे माजी अध्यक्ष आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्राचार्य सुधीर अहिवळे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.