फलटण तालुक्यात कायद्याचे, न्यायाचे, स्वातंत्र्याचे व प्रगतीचे राज्य निर्माण होईल – समशेरसिंह नाईक निंबाळकर

फलटण : राज्यात महायुतीचे सरकार सत्तारुढ झाल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. फलटणच्या जनतेने आमच्यावर दर्शविलेल्या विश्वासामुळे आम्हा सर्वांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे. अगामी काळात फलटण शहर व तालुक्यात कायद्याचे, न्यायाचे, स्वातंत्र्याचे व प्रगतीचे राज्य निर्माण होईल असा विश्वास फलटण नरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
गुरुवार दि. पाच डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रसारण शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले होते. शपथविधी पार पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्यावतीने फाटक्यांची आतिषबाजी करून व साखर वाटून आपला आनंद व्यक्त केला. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना समशेरसिंह बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, अनुप शहा, फिरोज आतार, रमेश पवार, राजेश हेंद्रे, उपकार काशीद, संजय गायकवाड, अमित रणवरे, सागर शहा आदींसह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आज महायुतीच सरकार राज्यात पुन्हा एकदा स्थिरस्थावर झालेल आहे. फलटणच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे मुंबईत विधानसभेमध्ये फलटणचे प्रतिनिधित्व शेतकरी कुटुंबातील एक घटक आमदार म्हणून करीत असल्याचे सांगून समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, अगामी काळात पाणी प्रश्न, रेल्वे प्रश्न, रस्ते, आरोग्य, शिक्षण अशा विविध प्रश्नांसह जी कामे अविकसित राहिलेली आहेत त्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. फलटण शहर व तालुक्यात आता कायद्याच, न्यायाच आणि स्वातंत्र्याच व प्रगतीचे राज्य निर्माण होईल. आज महायुतीचं सरकार सत्तारूढ झाल्याने आम्ही सर्वजण आनंदोत्सव साजरा करीत आहोत आणि या आनंदोत्सवामध्ये प्रत्येक नागरिक अगदी मनापासून सहभागी झालेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य स्क्रीनवर शपथविधी सोहळ्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. शपथविधी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हा सोहळा पार पडल्या नंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी साखरेचे वाटप केले, तर समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!