फलटण : ग्राहक संरक्षण कायद्याबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी व नागरिक आपल्या हक्कांप्रती जागरूक व्हावेत या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेल्या सह्याद्री बाणाच्या ग्राहकहीत या दिवाळी विशेष अंकास वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.
बाजार पेठेत ग्राहक हा राजा असताना देखील तो अद्यापही आपल्या हक्कांबाबत फारसा जागरूक नाही. त्यामुळे ग्राहक राजाने आपल्या हक्कांबाबत सजग व जागरूक व्हावे या हेतूने सह्याद्री बाणाच्या ग्राहकहीत या दिवाळी अंकात विविध विषयांवरील जागरूकता निर्माण करणारे व वाचकांना सहजपने समजतील अशा लेखन शैलीतील लेखांचा समावेश आहे. सदर लेख आपली फसवणूक होऊ नये यासाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरणार आहेत. या अंकात ग्राहकांचे हक्क, विदयार्थीही ग्राहक, फसव्या जाहिरातीमुळे होणारी लुबाडणूक, ओटीपीच्या माध्यमातून होणारी फसवणूक, अन्न व औषध प्रशासन, एमआरपी म्हणजे काय, विद्युत ग्राहकांचे अधिकार, सोने खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, बनावट बियाणे आदी विषयांवरील महत्वपूर्ण लेख वाचकांना मार्गदर्शक ठरणार आहेत.
ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे नेमके काय, त्याचा उपयोग व वापर ग्राहकांना आपल्या वास्तव जीवनात कशा पद्धतीने करता येईल याबातची जनजागृती व्हावी या उद्देशाने एका वेगळ्या विषयावर प्रकाशित करण्यात आलेल्या सह्याद्री बाणाच्या ग्राहकहीत या दिवाळी अंकास वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.