सतिश भोसले ‘महाराष्ट्र गोवा अचिव्हर्स सोशल अवॉर्ड’ ने सन्मानित

फलटण : श्रीपालवण व बोथे ता. माण येथील ग्रामविकास अधिकारी सतिश भोसले यांना ‘महाराष्ट्र गोवा अचिव्हर्स सोशल अवॉर्ड २०२४’ हा पुरस्कार माजी केंद्रीय कायदेमंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते व गोव्याचे माजी शिक्षणमंत्री सुभाष शिरोडकर, पद्मश्री आमदार राँडल्फ फर्नांडिस यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.
ग्रामविकास, सामाजिक, शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सतिश भोसले हे फलटण तालुक्यातील सरडे गावचे रहिवासी असून ते सध्या माण तालुक्यातील बोथे, श्रीपालवण, वडगाव येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. नुकतेच या पुरस्काराचे वितरण समारंभपूर्वक करण्यात आले.
यावेळी गजल गायक अजय नाईक, चिंबेल, गोवा, सरपंच संजय शिरोडकर, उद्योजक दिनेश उगडे, प्रा. डॉ. बी एन. खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराला बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भोसले यांचे अभिनंदन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!