आठ वर्षांची राजनंदिनी पडर ठरली आमदार गोपीचंद पडळकरांची स्टार प्रचारक

फलटण : २८८ जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर हे सुमारे ३९००० इतके मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. या पाठीमागे पडळकर यांचे मजबूत संघटन, बुथ लेवलला केलेले सुक्ष्म नियोजन यांचा मोठा वाटा असला तरी प्रचारात खरे आकर्षण एक चिमुकली ठरली आहे.
जावली ता. फलटण जि. सातारा येथील राजनंदिनी विठ्ठल पडर या इ. ३ रीत शिकणाऱ्या चिमुकलीने अनेक सभांमधून भाषण करत मतदारांची मने जिंकली.
महिला मतदार, युवक व ज्येष्ठ मतदारांना साद घालत राजनंदिनी या चिमुकलीने केलेल्या भाषणांमुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारात चांगलीच आघाडी घेतली.अनेक मतदार सभास्थळी राजनंदिनी हिच्या भाषणाचे कौतुक करताना दिसून येत होते.

राजनंदिनी हिने केलेल्या भाषणाबदद्ल तिचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब, माजी मंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पु डोंगरे, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर,डाॅ. रविंद्र आरळी,सौ. माधवीताई पडळकर, शिक्षक बॅंकेचे मा. चेअरमन यु.टी. जाधव सर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!