फलटण : गावात सत्तारूढ गट व विरोधी गट हे दोन्ही गट राजे गटाचे असल्याने निवडणुकीत विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना मताधिक्य देणार असल्याचा निर्धार सासकल ता. फलटण येथील ग्रामस्थांनी केला आहे.
आमदार रामराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर व संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामे झाले असून येणाऱ्या काळातही गावच्या विधायक विकाससाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आश्वासन संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ग्रामस्थांना दिले आहे. त्यामुळे मुळातच राजे गटाचेच असणारे सत्तारूढ गट व विरोधी गट हे एकत्र आले आहेत. ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे श्रीफळ वाढवून आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. गावातील दोन्ही गटांनी एकत्र येत व आपसी मतभेद विसरून या निवडणुकीत कामाला सुरुवात केली आहे. संपूर्ण घर न घर, वड्या वस्त्या येथे प्रचार सुरू केला असून त्यास लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आजवर सासकल गावाला सहा साकव पुल, सहा सभा मंडप, फलटण दहिवडी रस्ता ते सासकल गावठाणकडे जाणाऱ्या रस्त्याचे दोन वेळा खडीकरण व मुरमीकरण, आठशे मीटर रस्त्याचे तीन वेळा डांबरीकरण, सासकल ते बांधोळा रस्त्याचे डांबरीकरण, सासकल पाटी ते सासकल गावठाण रस्त्याचे डांबरीकरण, तीन मोठे बंधारे, जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रंथालय व दोन आरसीसी मधील खोल्या या कामांसह अन्य विविध कामे यापूर्वी संजीवराजे नाईक निंबाळकर व विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच आठशे मीटर रस्त्याचे उर्वरित डांबरीकरण करने व अन्य उर्वरित कामांना गती देण्यात येणार आहे.
यावेळी सासकल गावच्या सरपंच उषा फुले, ग्रामपंचायत सदस्य मोहनराव मुळीक, लता मुळीक, चांगुणा मुळीक, माजी सरपंच लक्ष्मण मुळीक, सोपान मुळीक, सदानंद मुळीक, रघुनाथ मुळीक, मनोहर मुळीक, निलेश मुळीक, दत्तात्रय दळवी, भैरवनाथ मुळीक, संजय मुळीक, वाल्मीक मदने, सर्जेराव शिंदे, भगवान मुळीक, हनुमंत मुळीक, दिनेश मुळीक, सुधीर मुळीक, तुकाराम मुळीक, अंकुश तावरे, शंकर गोरे, मंगेश मुळीक(पाटील), राजेंद्र फुले, अनिल मुळीक, जयसिंग खुडे, पोपट घोरपडे, भाऊसो फरांदे, ज्ञानदेव कुंभार, संतोष सुतार, मनोहर मुळीक, उमाजी आडके, सूरज मदने, वैभव धुमाळ, प्रतिक मुळीक आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.