अनिकेतराजे व सत्यजितराजे यांचा फलटण शहरात होम टू होम प्रचाराचा धडाका

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ फलटण शहरातील प्रभागनिहाय होम टू होम प्रचाराचा धडाका फलटण तालुक्याचे युवा नेते अनिकेतराजे नाईक निंबाळकर व सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी लावला आहे.
काल (दि. १२) फलटण शहरातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून होम टू होम प्रचार दौऱ्यास शुभारंभ करण्यात आला. यावेळी अनिकेतराजे व सत्यजितराजे यांनी घरोघरी जात मतदारांशी थेट संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या प्रचार दौऱ्यास मोठ्या प्रतिसाद मिळाला असून प्रभाग क्रमांक नऊमध्ये दोघांचेही सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी फलटण नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ. वैशाली चोरमले, सातारा जिल्हा ॲम्युचर खो- खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भरत बेडके, अजिंक्य बेडके, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी उपप्राचार्य प्रा. दत्ता चोरमले, सत्यजित चोरमले, सुभाष चोरमले, रमेश चोरमले, योगेश शिंदे, बाथ्री तेली समाजाचे अध्यक्ष विशाल तेली, तात्यासाहेब तेली, दिपक तेली, जितेंद्र तेली, सचिन तेली, अमोल तेली, राकेश तेली, निखिल डोंबे, अमरसिंह पिसाळ, बापूसाहेब देशमुख, फलटण नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन किशोर तारळकर, बंटी गायकवाड, भरत माने, अमित पवार, गोटू पवार, सिद्धांत पवार, राजेंद्र चोरमले, बाळासाहेब चोरमले, रमेश चोरमले, ज्ञानेश्वर चोरमले, तुषार चोरमले, सागर चोरमले, विकास चोरमले, अमोल राऊत, यश शिंदे, संजय जाधव, उत्तमराव बोंद्रे, सागर निकम, युवराज निकम साहेब, प्रितसिंह खानविलकर, हेमंत पिसाळ, हरुणशेठ मेटकरी, शिवसेना मित्र पक्षाचे प्रमुख अक्षय तावरे, गणेश चोरमले महिला आघाडीच्या कल्पना गिड्डे आदी मान्यवर व प्रभागातील नागरिक या प्रचार दौर्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!