जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात १९८ उमेदवारांपैकी ८९ उमेदवारांची माघार ;१०९ उमेदवार निवडणूक लढविणार

सातारा : जिल्ह्यातील आठ मतदार संघातील १९८ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे छाननीमध्ये वैध ठरले होते. आज सर्व मतदारसंघातील एकूण ८९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये फलटण मधून १२, वाई १३, कोरेगाव १०, माण १२, कराड उत्तर १२, कराड दक्षिण १२, पाटण ७ व सातारा ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
फलटण विधानसभा मतदार संघामध्ये अमोल कुशाबा अवघडे- अपक्ष, ॲड.आकाश शिवाजी आढाव- अपक्ष, गंगाराम अरुण रणदिवे- अपक्ष, जयश्री दिगंबर आगवणे- अपक्ष, नंदू संभाजी मोरे- अपक्ष, प्रशांत वसंतराव कोरेगावकर – अपक्ष, बुवासाहेब हुंबरे- अपक्ष, भिसे विमल विलास (तुपे)- अपक्ष, राजेंद्र भाऊ पाटोळे- अपक्ष, रवींद्र रामचंद्र लांडगे- अपक्ष, हरीभाऊ रामचंद्र मोरे- अपक्ष, हिंदूराव नाना गायकवाड- अपक्ष.

वाई विधानसभा मतदारसंघामध्ये अविनाश मारुती फरांदे- अपक्ष, अशोकराव वामन गायकवाड- अपक्ष, ईशान गजानन भोसले – अपक्ष, कल्याण दादासो पिसाळ- देशमुख- अपक्ष, दत्तात्रय दादासाहेब पाटील- अपक्ष, दिलीप दगडू पवार – अपक्ष, नंदकुमार मुगूटराव घाडगे – अपक्ष, निलेश भगवान धनावडे- अपक्ष, प्रताप बाजीराव भिलारे – अपक्ष, प्रदीप रामदास माने- अपक्ष, रवींद्र मानसिंग भिलारे- अपक्ष, सर्जेराव गेणू मोरे – अपक्ष, सुरेशराव दिनकर कोरडे- अपक्ष,

कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अजित प्रदीप पवार- सनय छत्रपती शासन, नितीन भरत बोतालजी- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), ऋषीराज जगन्नाथ कणसे -अपक्ष, प्रिया महेश शिंदे -अपक्ष, वैशाली शशिकांत शिंदे-अपक्ष, शशिकांत धर्माजी शिंदे-अपक्ष, सुधाकर बाबूराव फाळके-अपक्ष, संजय बाबासाहेब भगत-अपक्ष, संजय शिवराम भोसले -अपक्ष, ॲड. संतोष गणपत कमाने-अपक्ष,

माण विधानसभा मतदारसंघामध्ये अनिल रघूनाथ पवार-स्वाभिमानी पक्ष, अरविंद महेश मारुती कचरे- अपक्ष, ज्योत्स्ना अनिल सरतापे- अपक्ष, विकास सदाशिव देशमूख- अपक्ष, नागेश विठ्ठल नरळे- अपक्ष, नंदकुमार उर्फ नानासाहेब महादेव मोरे- अपक्ष, राजेंद्र बाळू बोडरे- अपक्ष, शिवाजी शामराव मोरे- अपक्ष, सत्यवान गणपत कमाने- अपक्ष, सारिका अरविंद पिसे- अपक्ष, संदीप नारायण मांडवे (साळुंखे) – अपक्ष, हर्षद एकनाथ काटकर- अपक्ष.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अधिकराव दिनकर पवार- अपक्ष, इब्राहिम मेहमुद पटेल- अपक्ष, गणेश वसंत घोरपडे- अपक्ष, दत्तात्रय भिमराव भोसले पाटील- अपक्ष, प्रशांत रघूनाथ कदम- अपक्ष, महादेव दिनकर साळुंखे- अपक्ष, रवींद्र दत्तात्रय निकम- अपक्ष, रवींद्र भिकोबा सुर्यवंशी- अपक्ष, राजेंद्र बापूराव निकम- अपक्ष, शिवाजी अधिकराव चव्हाण- अपक्ष, सत्यवान गणपत कमाने- अपक्ष, संतोष पांडूरंग वेताळ- अपक्ष.

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये मुंकूद निवृत्ती माने- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), प्रशांत रघूनाथ कदम- अपक्ष, गणेश शिवाजी कापसे- अपक्ष, गोरख गणपती शिंदे- अपक्ष, चंद्रकांत भिमराव पवार- अपक्ष, जनार्दन जयवंत देसाई- अपक्ष, प्रकाश यशवंत पाटील- अपक्ष, रवींद्र वसंतराव यादव- अपक्ष, विजय नथूराम सोनावले- अपक्ष, शैलेंद्र नामदेव शेवाळे- अपक्ष, सुरेश जयवंतराव भोसले- अपक्ष, ऋषिकेश विजय जाधव—अपक्ष.

पाटण विधानसभा मतदार संघामध्ये सचिन नानासो कांबळे- रिपब्लीकन सेना, चंद्रशेखर शामु कांबळे- अपक्ष, दिपक बंडू महाडिक- अपक्ष, प्रकाश तानाजी धस- अपक्ष, यशस्विनी सत्यजितसिंह पाटणकर- अपक्ष, सयाजीराव दामोदर खामकर- अपक्ष, सर्जेराव शंकर कांबळे- अपक्ष,

सातारा विधानसभा मतदार संघामध्ये सोमनाथ हणमंत धोत्रे- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), अविनाश अरविंद कुलकर्णी- अपक्ष, दादासाहेब वसंत ओव्हाळ- अपक्ष, प्रशांत मारुती तरडे- अपक्ष, विवेकानंद यशवंतराव बाबर- अपक्ष, सागर शरद भिसे- अपक्ष, वसंत रामचंद्र मानकुमरे- अपक्ष, राजेंद्र निवृत्ती कांबळे- अपक्ष, सखाराम सावळा पार्टे- अपक्ष, हणमंत देवीदास तुपे- अपक्ष.
या उमेदवारांनी त्यांची उमेदवारी माघारी घेतली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!