फलटण : फलटण विधानसभा मतदार संघात आज एकूण २६ जणांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत चार नोव्हेंबर असून त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
२५५ फलटण (अजा) विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १९ उमेदवारांनी २६ उमेदवारी अर्ज दाखल केले तर एकूण २८ उमेदवारांनी ३९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
आज नामनिर्देश पात्र छाननी दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण, महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे-पाटील व राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या उमेदवारी अर्जबाबत आक्षेप घेण्यात आले होते परंतु निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सदर आक्षेप फेटाळून लावत तीनही नामनिर्देश पत्र तथा उमेदवारी अर्ज वैध ठरविले.
उमेदवारी अर्ज वैद्य ठरलेले उमेदवार व पक्षाचे नाव पुढील प्रमाणे चव्हाण दीपक प्रल्हाद ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ), प्रतिभाताई शेलार ( बसपा ), सचिन कांबळे-पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ), दिगंबर आगवणे ( राष्ट्रीय समाज पक्ष ), दीपक चव्हाण रामचंद्र ( सनय छत्रपती शासन ), रमेश आढाव ( स्वाभिमानी पक्ष ), सचिन भिसे ( वंचित बहुजन आघाडी ), अमोल अवघडे, अमोल करडे, ॲड. आकाश आढाव, ॲड. कांचनकन्होजा खरात, कृष्णा यादव, गणेश वाघमारे, गंगाराम रणदिवे, चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव, जयश्री आगवणे, नितीन लोंढे, नंदू मोरे, प्रशांत कोरेगावकर, बुवासाहेब हुंबरे, विमल भिसे, राजेंद्र पाटोळे, रविंद्र लांडगे, सूर्यकांत शिंदे, हरिभाऊ मोरे, हिंदुराव गायकवाड सर्व अपक्ष. गौतम काकडे व भीमराव बाबर या दोघांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. दरम्यान उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर चार नोव्हेंबर अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.