फलटण : फलटण शिंगणापूर मार्गावरील कोळकी येथील बस स्टॉप समोरील ग्राहकांच्या पसंतीचे हॉटेल रोहित इमारतीच्या नूतनीकरनानंतर पुन्हा खवय्यांच्या सेवेत रुजू होत आहे. तसेच सेवागिरी स्वीट्स ॲन्ड बेकरीचा व बेकरी उत्पादने निर्मितीचा शुभारंभही होणार असल्याची माहिती अजित मुळीक आणि अक्षय मुळीक यांनी दिली आहे.
शनिवार दि. २ नोव्हेंबर २०२४ रोजी दीपावली पाडव्याच्या दिवशी या दोन्ही उद्योगाना नव्याने प्रारंभ होणार आहे. १९९९ साली सासकल ता. फलटण येथील स्व. नामदेवराव तथा बाळासाहेब मुळीक यांनी कोळकी येथील मुख्य बस स्टॉप समोर हॉटेल व्यवसायास प्रारंभ केला होता. अल्पावधीतच उत्तम चव व विनम्र सेवा यामुळे हॉटेल रोहित स्थानिक ग्राहकांसह या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्येही लोकप्रिय ठरले. पूर्वीच्या जुन्या वास्तूच्या जागी आता नवीन सुसज्ज वास्तू उभारण्यात आली असून दीपावली पाडव्या पासून हॉटेल रोहितच्या असंख्य ग्राहकांना येथील रुचकर अल्पोपहारासह महाराष्ट्रीयन थाळीची चव पुन्हा चाखता येणार आहे. या व्यतिरिक्त सेवागिरी स्वीट्स ॲन्ड बेकरीच्या माध्यमातून बर्थडे केक, खारी, ब्रेड, लादी पाव, डोनेट, क्रीम रोल अशा विविध बेकरी उत्पादनांचे दालन ही नागरिकांसाठी खुले होणार आहे.